नराधमांना फाशीच झाली पाहिजे -नाना पाटेकर

April 20, 2013 11:43 AM0 commentsViews: 32

20 एप्रिल

दिल्लीत पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला प्रकार हा गलिच्छ आहे. मला कळत नाही, माणूस इतका विकृतीकडे का झुकायला लागला ? कुठे संस्कार कमी पडत आहे का ? आमच्या वेळी गुन्हे घडायचे पण त्याचे स्वरूप वेगळे होते. पण असा गलिच्छ प्रकार कधी घडला नाही. हा प्रकार किळसवाणा आहे. मानवतावादी दृष्टीकोन ठेवणार लोकं म्हणतात फाशी देऊ नका. मीही फाशीच्या विरोधात आहे पण अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेता नाना पाटेकर यांनी दिली.

close