मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण प्रदान

April 20, 2013 12:10 PM0 commentsViews: 17

20 एप्रिल

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज दुसर्‍या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकर यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर अभिनेता नाना पाटेकरला पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले. यावेळी दिग्दर्शक रमेश सिप्पी, शर्मिला टागोर, उद्योगपती आदी गोदरेज, ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त आणि विजय कुमार यांनाही पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

close