कांद्याच्या भावात मोठी वाढ

December 27, 2008 12:53 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर, मुंबईविनय म्हात्रेवारंवार बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एरवी दिवाळी नंतर नविन कांदा बाजारात येतो. पण डिसेंबर उजाडला तरीहि बाजारात नविन कांद्याची आवक वाढली नाही. यामुळे कांद्याचे भाव पन्नास टक्यांनी वाढले आहेत.अचानक वाढलेल्या कांद्याचे भाव नवी मुंबईतील बाजार पेठेत दहा रुपये किलो वरुन पंधरा ते सतरा रुपयांवर पोहचला आहे. तर हाच कांदा किरकोळ बाजार पेठेत 25 रुपये किलो दराने विकला जातोय. मुंबई आणि उपनगरासाठी दररोज नवीमुंबईच्या एपीएमसी बाजार पेठेत दिडशे ते दोनशे गाड्या कांदा येतो. ही आवक घटून सत्तर ते शंभर गाड्यावर आली आहे. दमट हवामानामुळे लहान कांदे तयार होत असल्यामुळे कांद्याची मागणीही कमी झाली आहे.

close