चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात 20 दिवसात 8 बळी

April 20, 2013 1:57 PM0 commentsViews: 26

महेश तिवारी, चंद्रपूर

20 एप्रिल

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा परिसरात गेल्या 20 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 8 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याचा परिणाम म्हणून संतप्त गावकर्‍यांनी एका बिबट्याच्या बछड्याला जाळून मारलंय. यामुळे वनक्षेत्र परिसरात वन्यप्राणी आणि माणूस यांच्यात संघर्ष पेटलाय.ताडोबा परिसरात असलेल्या जंगलात इथल्या महिला मोहफुलं वेचण्यासाठी जातात. तिथंच त्यांच्यावर बिबट्याकडून हल्ला होतो. आत्तापर्यंत या हल्ल्यात आठजणांना आपला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आता जंगलात मोहफुलं वेचायला जायचं कसं असा प्रश्न इथल्या लोकांपुढं आहे.

बिबट्याने केलेल्या आत्तापर्यंतच्या हल्ल्यांवर आपण एक नजर टाकूया…- मार्च 2009 मध्ये 45 जण ठार झालेत – 2010 वर्षातली ही संख्या 15 इतकी आहे – हल्ल्यातील मृतांना वनखात्याकडून 73 लाख 36 हजार रुपयांची मदतही मिळाली- तर बिबट्यानं पाळीव प्राण्यावर जे हल्ले केलेत त्यात 2008-09 सालात 5200 पाळीव प्राणी ठार – 2009-10 ला ही संख्या होती 1843, तर 2012-13 मध्ये ठार झालेल्या प्राण्यांची संख्या झाली दोन हजार जंगलातल्या पाणवठ्यांची संख्या कमी झाल्यानं असे हल्ले वाढताहेत, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. बिबट्यांच्या या वाढत्या हल्ल्यामुळं येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

close