मेधाताईंचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या -मुंडे

April 19, 2013 12:57 PM0 commentsViews: 38

19 एप्रिल

मेधा पाटकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी 2009 मध्ये कोणतंही मंत्रीपद नव्हतं. साहजिकच मला कोणत्याही सरकारी कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. पाटकर यांनी जी नावं घेतली आहे त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. उलट मेधाताईंना याबाबत पुरावे द्यावेत अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. उद्या कुणाच्या घरी जर धाड पडली आणि त्यावेळी त्याठिकाणी कुणाचे नाव सापडले तर काय त्या व्यक्तीला दोषी ठरवायचं का ? असा प्रति सवालही मुंडेंनी केला.

close