सतेज पाटील यांची दुष्काळग्रस्तांना मदत

April 12, 2013 11:58 AM0 commentsViews: 21

12 एप्रिल

कोल्हापुर : आपल्या वाढविशी कार्यकर्त्यांनी हार तुरे आणि पोस्टर्स न लावता दुष्काळग्रस्तांसाठी धान्यं गोळा करण्याचं आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं होतं. त्याला कोल्हापुरमधल्या कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन दुष्काळग्रस्तांसाठी मदत केलीय. गेले 8 दिवस हे धान्य गोळा करण्यात आलं असून आतापर्यंत 30 लाख रुपयांचं धान्य गोळा करण्यात आलंय. येत्या 8 दिवसांत हे धान्य प्रत्येकी 5 किलोच्या पॅकिंगमध्ये बांधून ते दुष्काळी भागात वाटण्यात येणार आहे. सतेज पाटील हे गेले 5 वर्ष आपल्या वाढदिवशी वह्या गोळा करण्याचा उपक्रम राबवतात. त्यामुळे वह्यांसोबतच आता दुष्काळग्रस्तांसाठी सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचेही वाढदिवस अशाच प्रकारे साजरे करावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.

close