दहशतवादाविरुद्ध एकत्र या : राष्ट्रपतींचे आवाहन

December 27, 2008 7:03 AM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर, नागपूरअतिरेक्यांशी लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलीय. त्या नागपूर दौर्‍यावर आहेत. नागपूरमधल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठानं 'सामाजिक एकता परिषदे' चं आयोजन केलं आहे. त्याचं उद्घाटन राष्ट्रपतींनी केलं. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर सामाजिक एकतेला तडा गेलाय. ती एकता आणि शांतता पुन्हा निर्माण करण्यासाठीच या परिषदेचं आयोजन विद्यापीठानं केलं. यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. "मुंबईवरील हल्ला हा राष्ट्राच्या आस्मिता आणि संस्कृतीवरील हल्ला आहे. त्याचा निषेध करायलाच हवा. दहशतवाद्यांना जात, धर्म नसतो. ते विनाशाचे मृत्यूदूत असतात. मात्र आपण ठामपणे एकत्र येऊन त्यांचा हल्ला परतवून लावायला हवा" असं त्या म्हणाल्या.

close