देशभरात रामनवमीचा उत्साह

April 19, 2013 7:35 AM0 commentsViews: 5

19 एप्रिल

आज रामनवमीनिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे. नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात विशेष पूजा आणि आरती करण्यात आली. रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक जमलेत. अयोध्येतून वाहणार्‍या शरयूत स्नान करून भाविक उत्सवात सहभागी होत आहेत. तर आज शिर्डीतही देशभरातून दीड लाख भाविक दाखल झालेत. रामनवमिनित्त शिर्डीत मोठा उत्सव होत असतो. बाबा असतानाच्या काळापासून हा उत्सव होत असतो. राज्यातून 200 दिंड्या आणि यात्रा शिर्डीत पोहचल्या आहेत. गर्दीमुळं 24 तास दर्शन खुलं करण्यात आलंय. तर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरु आहे. दरवर्षी हजारो लोक या मंदिरात येऊन दर्शन घेतात. संध्याकाळी राम मंदिरापासून भव्य शोभायात्राही काढण्यात येते. यावेळी 'राम जन्मला गं सखे..राम जन्मला' असं भजन म्हणत सगळे नागपुरकर सहभागी होतात

close