अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

April 12, 2013 12:34 PM0 commentsViews: 62

12 एप्रिल

ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. प्राण यांनी साडेतीनशेहून अधिक चित्रपटांत काम केलंय. प्राण यांना पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहे पण हा पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळायला हवा होता अशी प्रतिक्रिया सिनेजगतातून आणि रसिक प्रेक्षकांकडून व्यक्त होतं आहे.

स्टार व्हिलन.. देखणे..त्यांच्यामुळे त्यांचे हिरोही उठून दिसायचे.. प्राण.. म्हणजेच प्राण क्रिश्न सिकंद..लाहोरमध्ये 2 फेब्रुवारी 1920ला जन्म.. लाहोरमध्येच पंचोली स्टुडिओत प्राण यांचं करिअ सुरू झालं ते कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये.. बॉलिवूडच्या या व्हिलननं नंतर कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांची पहिली भूमिकाही खलनायकाचीच होती. 1940मध्ये दलसुख पंचोली यांच्या पंजाबी सिनेमा यमला जाटमध्ये ते खलनायक होते. त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या खानदान सिनेमात प्राण नायक होते. आणि फाळणीपर्यंत त्यांना नायकाच्याच भूमिका मिळत होत्या. फाळणीनंतर मुंबईला आलेल्या प्राण यांना थोडा संघर्ष करावा लागला. पण लेखक सादत हसन मांटो यांच्या मदतीनं त्यांना जिद्दीमध्ये भूमिका मिळाली. जिद्दीचे हिरो होते देव आनंद. आणि हा सिनेमा प्राण यांच्या करियरमधला टर्निंग पाँइंट बनला.

प्राण यांनी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासोबत जास्तीत जास्त काम केलंय. औरत, बडी बहेन, जिस देस मे गंगा बहती है, हाल्फ टिकिट, पुरब और पश्चिम, डॉन, अमर अकबर अँथनी, जंजीर… प्राण यांच्या या सिनेमांतल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. उपकार, आँसू बन गये फूल आणि बेईमान सिनेमांसाठी प्राण यांना सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळालं. 1997 मध्ये फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. 2001 मध्ये पद्मभूषणनं त्यांचा गौरव केला गेला. तर 2010मध्ये दादासाहेब फाळके ऍकॅडमीतर्फे त्यांना सन्मानित केलं गेलं.

भारतीय सिनेमांमध्ये खलनायक म्हणून अजरामर झालेले प्राण यांचा अभिनय कधीच एकसुरी झाला नाही. त्यांनी काही विनोदी भूमिकाही केल्या. 1997मध्ये अमिताभ बच्चनच्या मृत्यूदाता सिनेमात त्यांनी शेवटची भूमिका केली. 350पेक्षा जास्त सिनेमे करणारे प्राण प्रेक्षकांसाठी कायमचे आवडते खलनायक होते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय,आयबीएन लोकमततर्फे त्यांचं अभिनंदन

प्राण यांचं आतापर्यंतच्या चित्रपट सृष्टीतलं योगदान- प्राण यांनी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासोबत जास्तीत जास्त काम – औरत, बडी बहेन, जिस देस मे गंगा बहती है, हाल्फ टिकिट, पुरब और पश्चिम, डॉन, अमर अकबर अँथनी, जंजीर- उपकार, आँसू बन गये फूल आणि बेईमान सिनेमांसाठी प्राण यांना सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळालं – 1997 मध्ये फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला- 2001 मध्ये पद्मभूषणनं त्यांचा गौरव केला गेला- तर 2010मध्ये दादासाहेब फाळके ऍकॅडमीतर्फे त्यांना सन्मानित केलं गेलं

close