थरार मुंगी घाटाचा

April 25, 2013 11:39 AM0 commentsViews: 69

25 एप्रिल

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेच्या निमित्तानं महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी राज्यातले लाखो भाविक मुंगी घाटातून कावडीतून पाणी घेऊन जातात. ऐन उन्हाळ्यात केवळ श्रध्देपोटी हे भाविक हा खडतर घाट पार करतात. कोथळे गावातून हे गावकरी महादेवाचा गजर करत प्रस्थान करतात. या घाटाचे तीन टप्पे आहेत आणि घाट चढायला साधारणत: दोन तास लागतात. पायात चप्पल किंवा बूट नसतात. त्यांच्या साथीला असतात डफाचा ताल, यामध्ये महिला किंवा लहान मुलंही मागे नसतात. यावेळेला महादेवाकडे मात्र सगळ्यांनी देवा भरपूर पाऊस पडू दे…असंच मागणं मागितलं आहे.

close