गडचिरोलीमध्ये चकमकीत 4 नक्षलवादी ठार, 1 कमांडो शहीद

April 12, 2013 1:43 PM0 commentsViews: 36

12 एप्रिल

गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडली. या चकमकीत 4 नक्षलवादी ठार तर एक पोलीस कमांडो शहीद झाला आहे. तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातल्या सिंदेसूरमध्ये दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या ही घटना घडली. हा परिसर अतिसंवेदनशील मानला जातो. गडचिरोलीचे डिआयजी रवींद्र कदम आणि एसपी सुवेझ हक यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहांचं पोस्टमार्टेम सध्या सुरु आहे. या चकमकीत शहीद झालेल्या जवानाला उद्या सलामी दिली जाणार आहे.

close