लतादीदींवर टीका अशोभनीय -ह्रदयनाथ मंगेशकर

April 25, 2013 2:56 PM0 commentsViews: 48

25 एप्रिल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर नाट्यक्षेत्रातून करण्यात आलेल्या टीकेमुळे धाकडे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर चांगलेच भडकले. काही लोकांना टीका करण्याची हौसच असते पण त्यांनी एक लक्षात घ्यावे की, लतादीदी ह्या या प्रतिष्ठानच्या संस्थापक आहे. त्यांच्यावर टीकाकरणे हे अनाठायी आहे. कोणत्याही टीकाकारांना शोभत नाही अशा शब्दात ह्रदयनाथ मंगेशकर यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी लतादीदींनी मराठी नाटकांवर टीप्पणी केली होती. त्यावर काही नाट्यकर्मी लतादीदींवर टीका केली होती.

आज मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देण्यात आला. तर जुन्या नाटकांना पुनरुज्जीवित केल्याबद्दल सुनील बर्वे यांना मोहन वाघ पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या नीला श्रॉफ यांना आनंदमयी पुरस्कार देण्यात आला. नाटक आणि मराठी चित्रपटांतील योगदानाबद्दल मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार वंदना गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. तर साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल रत्नाकर मतकरी यांना गौरव्

close