सैफची पोटदुखी

December 27, 2008 2:10 PM0 commentsViews: 7

27 डिसेंबर, मुंबईपोटदुखीच्या त्रासामुळं अभिनेता सैफ अली खानला मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलंय. यावेळी त्याची विचारपूस करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज लिलावतीमध्ये जात आहेत. पोटाच्या दुखण्याने सैफ यापुर्वीही त्रस्त होता. आता आतड्यांच्या इन्फेक्शनमुळे त्याचं पोट दुखत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान सैफवर सध्या उपचार सुरू आहेत. नुकतंच करीना आणि सैफनं फिलाडेल्फिया मध्ये रेन्सील डिसल्वाच्या एका सिनेमाचं शुटिंग संपवलं आहे. यानंतर मुंबईत परतल्यावर सैफला हा त्रास सुरू झाला. यावेळी सैफची गर्लफ्रेन्ड करिना कपूर, तिचं कुटुंब आणि सैफचा मित्र परिवार त्याच्यासोबत आहेत.

close