पाकिस्तानची युद्धाची भाषा मवाळ

December 27, 2008 3:50 PM0 commentsViews: 2

27 डिसेंबर, कराचीगेल्या काही दिवसांपासून युद्धाची भाषा करणार्‍या पाकिस्ताननं शनिवारी आपला सूर थोडासा मवाळ केला. भारत-पाकिस्तानमधला तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या मित्रांनी मदत करावी, असं आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी केलं. पाकिस्तानी पहिल्यांदा वार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण, भारतानं हल्ला केल्यास आपली जय्यत तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे."युद्ध झालं तर आमचं सैन्य लढण्यासाठी तयार आहे, पण मी आश्वासन देतो की आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही, पण प्रतिक्रिया देण्याची आमची ताकद आहे. मुस्लीम म्हणून आम्ही आमचं संरक्षण करू आणि आम्हाला जगाला हाच संदेश द्यायचा आहे की आम्ही पुढाकार घेऊन कोणतेही चुकीचे पाउल उचलणार नाही." असं ते म्हणाले.गेले काही दिवस पाकिस्तान सतत युद्धाच्या वल्गना करत आहे. आपल्यावरील आरोप लपवण्यासाठी पाकिस्तानने भारतावरच दहशतवादाचे आरोप केले होते. राजस्थान सीमेवर त्यांनी सैन्याची जमवाजमवही सुरू केली होती. मात्र भारताची ठाम भूमिका आणि वाढता आंतरराष्ट्रीय दबाव, यामुळे पाकिस्तानने आपली भूमिका मवाळ केल्याचं मानलं जात आहे.

close