अशोक चव्हाणांच्या याचिकेला संरक्षण मंत्रालयाचा विरोध

April 12, 2013 4:39 PM0 commentsViews: 7

12 एप्रिल

आदर्श प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या याचिकेला विरोध केलाय. आणि त्यासंदर्भातली एक हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहेत. अशोक चव्हाण यांनी आदर्श प्रकरणात त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केलीय. आदर्श प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाने किंवा राज्य सरकारने सीबीआयला सांगितलेलं नाही. आणि म्हणून सीबीआयला चौकशी करण्याचा अधिकार नाही अशी याचिका चव्हाण यांनी हायकोर्टात केली. संरक्षण मंत्रालयाने मात्र आपण या संदर्भात सीबीआयकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली असं आपल्या याचिकेत म्हटलंय. सीबीआयच्या या याचिकेला चव्हाण यांच्या वकीलांनी मात्र हायकोर्टात विरोध केला.

close