हरभजननं मला थप्पड मारलीच नव्हती -श्रीसंत

April 12, 2013 4:54 PM0 commentsViews: 7

12 एप्रिल

आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यानची मॅच क्रिकेटप्रेमी अजून विसरले नसतील. या मॅचमध्ये मुंबईच्या हरभजननं पंजाबच्या श्रीसंतला थप्पड लगावली होती. आणि हे प्रकरण चांगलच गाजलं होतं. पण हरभजननं मला थप्पड मारली नव्हती, असा खुलासा एस श्रीसंतनं आज ट्विटरवर केला. हे सर्व मीडियानं रंगवलेलं चित्र असल्याचं श्रीसंतनं म्हटलं आहे. दरम्यान, श्रीसंतच्या खुलाशाचा निवृत्त न्यायाधीश सुधीर नानावटी यांनी चांगलाच समाचार घेतला. नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं या प्रकरणाची चौकशी केली होती. हरभजननं श्रीसंतला थप्पडच मारली होती, आणि याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं नानावटी यांनी म्हटलं आहे. थप्पड मारल्यानंतरही हरभजन पुन्हा श्रीसंतच्या अंगावर धावून गेला होता. तेव्हा त्याला सुरक्षारक्षकांनी अडवलं होतं असंही नानावटी यांनी स्पष्ट केलंय

close