काश्मीरमध्ये रविवारी मतमोजणी

December 27, 2008 4:49 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी मतमोजणी होतेय. पण, त्याठिकाणी त्रिशंकू विधानसभेची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच आघाडी बनवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चाचपणी सुरू झाली आहे.जम्मू आणि काश्मीरमधल्या राजकारणामध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे तीन प्रमुख पक्ष आहेत. आपल्याच पक्षाचं सरकार सत्तेवर येईल असा या तीनही पक्षांचा दावा आहे. पण, सध्याच्या स्थितीवरून तिथं कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता कमी दिसतेय. दोन पक्षांचं आघाडी सरकार सत्तेवर येईल. आणि तिस-या पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागण्याची चिन्हं आहेत. राजकीय विश्लेषक सांगतात, एकाच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे अपक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस या मुख्य पक्षांत लढत आहे. पीडीपीला अधिक मतं मिळाली तर पीडीपी-काँग्रेसमध्ये आघाडी होईल किंवा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हा देखील पर्याय आहे. काँग्रेसनं सावध भूमिका घेतली आहे. कारण पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये युती होण्याची शक्यता धूसर आहे. उलट ही निवडणूक अब्दुल्लाह आणि मुफ्ती या दोन घराण्यांमधली वादविवादाची निवडणुकच ठरलीय. मात्र, निकालाला अजून अवकाश असला तरी, पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

close