सनरायजर्सचा दिल्लीवर 3 गडी राखून विजय

April 12, 2013 6:03 PM0 commentsViews: 9

12 एप्रिल

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 विकेटनं मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं 8 विकेट गमावत 114 रन्स केले. विजयाचं हे माफक आव्हान पार करताना सनरायजर्सला चांगलंच झुंजावं लागलंय. दिल्लीच्या बॉलर्सनं प्रमुख बॅट्समनची विकेट घेत सनरायजर्सला कडवी लढत दिली. पण अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये स्टेननं फोर मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close