दोन अल्पवयीन अपंग मुलींवर शिपायाचा बलात्कार

April 13, 2013 10:04 AM0 commentsViews: 58

13 एप्रिल

जुन्नर तालुक्यातल्या अणे इथल्या अपंग कल्याण केंद्रातल्या दोन अल्पवयीन अपंग मुलींवर 51 वर्षीय शिपायानं बलात्कार केल्याचं उघड झालंय. याप्रकरणी आरोपी शिपाई महादू बोराडेला अटक करण्यात आली असून नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. अपंग केंद्रातल्या धान्याच्या कोठारात गेले वर्षभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानं पालक मुलींना घरी नेण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जुन्नर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश बोरा यांची ही संस्था असून या प्रकरणानं परिसरात खळबळ उडाली आहे. नारायण गाव पोलीस स्टेशनसमोर झालेल्या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना, आणि स्वाभिमान अंध संघटना सहभागी झाल्या होत्या. या घटनेला जबाबदार असलेल्या संस्थाचालकांना अटक करण्याची मागणी त्यांनी केलीय्. कारण या संस्थेत असे प्रकार यापूर्वीही झाल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.

close