गडचिरोलीत चकमकीत शहीद जवानाला अंतिम सलामी

April 13, 2013 2:19 PM0 commentsViews: 14

13 एप्रिल

गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झाले होते. या चकमकीत एक पोलीस कमांडो शहीद झाला होता तर दोन आदिवासींचा मृत्यू झाला होता. या घटनेत गोविंद फरकाडे हे नक्षलवादी पथकाचे जवान शहीद झाले होते. शहीद जवान गोविंद फरकाडे यांना आज गडचिरोलीच्या पोलिस मैदानावर अंतिम सलामी देण्यात आली. राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करून यावेळी श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या 3 फैर्‍या झाडून फरकाडे यांना सलामी देण्यात आली. यावेळी शहीद कुटुंबीयांचा आक्रोश पाहून पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचेही डोळे पाणावले. दरम्यान, कालच्या घटनेत ठार झालेल्या 2 आदिवासी नागरिकांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची आर्थिक मदत गृहमंत्री आर आर पाटील यांनी जाहीर केली.

close