वर्षाअखेरीस म्हाडाची 3863 घरं विक्रीसाठी तयार

December 28, 2008 8:14 AM0 commentsViews: 2

28 डिसेंबर, मुंबईकविता कृष्णनसाडेतीन लाखात मुंबई शहरात घर घ्यायचंय ? तेही घाटकोपर,चेंबूर, सायन, गोरेगाव, मालाडसारख्या ठिकाणी ? हे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकेल. म्हाडा 3863 घरांची विक्री करणार आहे. 12 जानेवारीपासून यासाठी अर्ज उपलब्ध होतील. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या एचडीएफसीच्या 15 शाखांमध्ये हे अर्ज मिळतील. भरलेले अर्ज तिथंच स्वीकारले जातील.म्हाडाची घरं म्हणजे लो बजेट. मध्यमवर्गाला परवडणारी. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या बजेट हाऊसिंगच्या घरांचं बुकिंग सुरू होत आहे. या नव्या फ्लॅट्सच्या फॉर्मच्या विक्रीपासून ते अलॉटमेंटपर्यंतची संपूर्ण जबाबदारी एचडीएफसी बँक उचलणार आहे. विक्रोळी, घाटकोपर,चेंबूर, सायन, वर्सोवा, गोरेगाव, मालाड आणि दहिसर या उपनगरातल्या फ्लॅटची किंमत साडे तीन ते पन्नास लाखांपर्यंत असणारेय. म्हाडाच्या घरांची बांधणीसुद्धा ग्राहकांच्या उत्पन्न गटांप्रमाणे करण्यात आलीये. कमी उत्पन्न गटासाठी चारशे स्क्वेअर फूट, मध्यम उत्पन्न गटांसाठी सातशे स्क्वेअर फूट आणि उच्च उत्पन्न गटांसाठी एक हजार स्क्वेअर फूट जागा देण्यात येणार आहे. पण जे मुंबईचे रहिवासी आहेत त्यांनाचं ही जागा दिली जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांना लॉटरीच्या प्रक्रियेतून जावं लागेल.या घरांशिवाय वर्षभरात आणखी चार हजार फ्लॅटस म्हाडा विक्रीला काढणार आहे.म्हाडाची ही घरं घेण्यासाठी बँकांनी जाहीर केलेल्या होम लोनचा फायदा ग्राहकांना घेता येईल. कारण या सर्व घरांच्या किंमती वीस लाखांपेक्षा जास्त नाहीत.

close