आईची हत्या करून तरूणाने केली आत्महत्या

April 13, 2013 2:38 PM0 commentsViews: 40

13 एप्रिल

सातारा : आर्थिक व्यवहारात तोटा झाल्यामुळे आलेलं नैराश्य आणि आईच्या आजारापणाला वैतागून तरूणाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना सातार्‍यात घडली. सातार्‍यातील सदर बाजार परिसरातील सत्यम बी या इमारती राहणारा कुणाल वाडकर याने हे कृत्य केलंय. कुणालची आई लता वाडकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. कुणालला आर्थिक व्यवहारात फसवणुकीमुळे मोठं नुकसान झालं. पैसे गेलेच्या चिंतेतून कुणालला नैराश्य आलं. त्यांने या जाचातून सुटका करून घेण्यासाठी आत्महत्या करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने मित्राकडून रिव्हॉल्व्हर मिळवली. पण आपण गेल्यानंतर आपल्या आजारी आईचा सांभाळ कोण करणार ह्या चिंतेतून कुणालने पहिल्यांदा आईची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. आणि त्यानंतर त्याने सातार्‍यापासून 25 किलोमीटर अंतरावरील कास भागात स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

close