मुंबईचा पुण्यावर 41 रन्सनं दणदणीत विजय

April 13, 2013 3:15 PM0 commentsViews: 13

13 एप्रिल

पहिल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं पुणे वॉरियर्सवर 41 रन्सनं दणदणीत मात केली. या स्पर्धेतला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय तर पुणे वॉरियर्सचा तिसरा पराभव ठरलाय. या मॅचवर पूर्णपणे मुंबईनं वर्चस्व गाजवलं. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सनं 184 रन्सचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकनं तुफान फटकेबाजी करत स्कोर वाढवला. तर ओपनर सचिन तेंडुलकरलाही चांगला सूर गवसलाय. सचिननं अशोक दिंडाच्या एकाच ओव्हरमध्ये सलग चार फोर मारले. मुंबईचे बॉलर्सनंही दमदार कामगिरी केली. मिचेल जॉन्सननं पहिल्याच ओव्हरमध्ये पुण्याचा ओपनर ऍरॉन फिंचला क्लिन बोल्ड करत पहिला धक्का दिला. तर रॉबिन उत्थपा आणि रॉस टेलरही झटपट आऊट झाले. मिचेल मार्शनं फटकेबाजी करत पुणे टीमला किमान 142 रन्सचा टप्पा गाठून दिला.

close