पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा :जेडीयू

April 13, 2013 3:33 PM0 commentsViews: 7

13 एप्रिल

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीच्या संयुक्त जनता दलानं भाजपला इशारा दिला आहे. एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा असं म्हणत जेडीयूनं नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भाजप-जेडीयूमध्ये याबाबत कालपासून चर्चा सुरू होती. यावर आज जेडीयुच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

close