जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अतिरेकी हिमायत बेग दोषी

April 15, 2013 7:57 AM0 commentsViews: 33

15 एप्रिल

पुणे : इथं जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलं आहे. पुणे सेशन्स कोर्टाने हा निकाल दिलाय. हिमायत बेग कटात सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झालाय. आता हिमायतवरच्या शिक्षेची सुनावणी 18 एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

13 फेब्रुवारी 2010.. संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला. पुण्यावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला. यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 64 जण जखमी झाले. स्फोटानंतर काही महिन्यांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला पुण्यात अटक करण्यात आली. दुसरा आरोपी जबिबउद्दीन अन्सारी याला 26/ 11 प्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. हिमायतनं केलेला श्रीलंकेचा दौरा आणि सापडलेले इतर पुरावे याच्या आधारे तब्बल 2,500 पानी चार्जशीट पोलिसांनी तयार केलं होतं. 11 मार्चला या प्रकरणातली शेवटची साक्ष झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती पी एन धोटे यांनी हिमायतला दोषी ठरवलं.गुन्हेगारी कट रचणं, दहशतवादी कारवाया, बॉम्बस्फोट कटात सहभागी, स्वतःकडे आरडीएक्स बाळगणं, बनावट कागदपत्रं तयार करणं, प्रक्षोभक भाषणं करणं, सदोष मनुष्यवध, खून हिमायत बेगला या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलंय.आरोपीचे वकील ए.रेहमान यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

18 एप्रिलला हिमायतला आता कोर्ट आता काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या प्रकरणामध्ये भटकळ बंधुंसह इतर पाच आरोपी अजूनही फरार आहेत.

हिमायत बेगने काय केलं ?- हिमायत बेग याने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची रेकी केली होती.- कटाच्या बैठकीसाठी त्यानं इतर आरोपींना उद्गीरमध्ये जागा उपलब्ध करून दिली.- बॉम्ब ठेवण्यासाठीची बॅगही बेगने आणली होती.- बॉम्बस्फोटासाठी ज्या नोकिया फोनचा वापर करण्यात आला तो मोबाईलही बेगनेच विकत घेतला होता- कट रचण्यामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होताहे 5 आरोपी फरार

यासीन भटकळरियाज भटकळ इकबाल भटकळ फैयाज कागजीमोहसीन चौधरी

close