ठाण्यात 1 हजार अनधिकृत इमारतींना नोटिसा

April 15, 2013 8:13 AM0 commentsViews: 7

15 एप्रिल

ठाणे : इथं पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तृळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणानी अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरु केलीय.आजपासून पुन्हा नेते आणि प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. सुमारे 1 हजार 49 धोकादायक आणि 67 अति धोकादायक बेकायदा इमारतींसह सुमारे पाच हजार बांधकामांना नोटिसा बजावण्याची शक्यता आहे.

close