क्लिनींग आणि मेंटनन्सच्या क्षेत्रात मराठी उद्योजकाची मोठी भरारी

December 28, 2008 4:20 AM0 commentsViews: 5

28 डिसेंबर, पिंपरी चिंचवडसागर शिंदेसाफसफाईचं काम हलक्या दर्जाचं काम म्हणून ओळखलं जातं. पण, पुण्यातल्या हणमंत गायकवाड या उद्योजकानं याच कामाचा वापर करून बीव्हीजी इंडिया, या कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी राष्ट्रपती भवन, संसद भवन, दिल्ली हाय कोर्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांची क्लिनिंगग आणि मेंटनन्सची कामे करते.हणमंत गायकवाड बी.व्ही.जी इंडीया कंपनीचे एम.डी. आहेत. या मराठी माणसाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बी.व्ही.जी. इंडीया कंपनी स्थापन केली. आज या कंपनीनं क्लिनींग आणि मेंटनन्सच्या क्षेत्रात जगभरात नाव कमावलंय. कंपनींचा टर्नओव्हर सध्या वर्षाला दोनशे कोटी रुपये आहे. "आम्ही पहिल्यापासूनच गुणवत्तेला प्राधान्य दिलं. त्यामुळेच आमचं काम लोकांना आवडलं आणि प्रतिसाद मिळत गेला" असं हणमंत गायकवाड यांनी सांगितलं.बी.व्ही.जी कंपनीची कारर्कीद संपुर्ण जगभरात पसरलीय .भारतात एकवीस तर लंडन आणि सिंगापूर मध्ये दोन शाखा उघडण्यात आल्या. या कंपनीनं सिव्हील इंजिनीअरींग, लँडस्केप डिझायनींग अ‍ॅन्ड गार्डनिंग अशा क्षेत्रातदेखील क्लिनींग आणि मेंटनन्सची कामे करण्यास सुरवात केली आहे.बीव्हीजी इंडिया कंपनीनं आता परदेशातही काम मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. येत्या दहा वर्षांत दहा वर्षात दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

close