‘अजित पवार खरंच जर पश्चाताप झाला असेल तर राजीनामा द्या’

April 15, 2013 8:33 AM0 commentsViews: 19

15 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरच जर पश्चाताप झाला असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी निदान माफी तरी मागावी अशी मागणी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज प्रथमच मुंबईत आले, तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी अजित पवारांच्या मुद्द्यावरून शेकापसहित सर्व विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. इंदापूरमधील बेताल वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी रविवारी कराड इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतीसंगमावर आत्मक्लेशासाठी एक दिवसाचं उपोषण केलं. मात्र त्यांच्या उपोषणावर विरोधकांनी कडाडून टीका केली. त्यांचे आत्मक्लेश हे नाटक आहे अशी टीका विरोधकांनी केली.

close