उजनी धरणाच्या प्रश्नी हायकोर्टाने सरकारला फटकारले

April 15, 2013 9:31 AM0 commentsViews: 34

15 एप्रिल

उजनी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच या प्रकरणात गुंतागुंत निर्माण झाली असल्याचं कोर्टाने नमूद केलंय. उजनी धरणासाठी पाणी सोडण्यात यावं यासाठी दोन शेतकर्‍यांनी याचिका दाखल केली. त्यावरच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले. उजनी धरणासाठी इतर दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येतंय. मात्र, ते पाणी उजनीमध्ये पोहोचण्यासाठी अजून 40 दिवस लागतील असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. जल स्रोत नियामक प्राधिकरणाच्या सदस्यांची नेमणूक लवकर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. धक्कादायक म्हणजे याच दोन शेतकरी आंदोलकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली होती. शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारला 24 तासात पाणी उजनी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. एकीकडे अजित पवार आंदोलकांची खिल्ली उडवली होती तर दुसरी न्यायालयाने आंदोलकांना न्याय देत अजित पवारांना धक्का दिला.

close