सात वर्षं उलटूनही अँम्ब्युलन्स कागदावरच !

April 15, 2013 9:43 AM0 commentsViews: 7

15 एप्रिल 2013

नागपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत क्रांती योजनेचा राज्यात बोजवारा उडालाय. केंद्र सरकारने 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत 16 राज्यांमध्ये 'क्रांती योजना' सुरू केली. अपघातातले जखमी, गंभीर दुखापतग्रस्त किंवा डायलिसिवर असणारे रुग्ण यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी या योजनेअंतर्गत अँम्ब्युलन्सची विशेष तरतूद करण्यात आलीय.

त्यासाठी 1 हजार 50 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रासाठी 937 ऍम्ब्युलन्स मंजूर करण्यात आल्यात. मार्चपर्यंत या अँम्ब्युलन्स महाराष्ट्रात धावतील असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं होतं. पण अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यात अँम्ब्युलन्स धावलीच नाही. महाराष्ट्रात एनआरएचएम (NRHM)च्या ऍम्ब्युलन्स सुरू करण्यासाठीचं कंत्राट पुण्याच्या भारत विकास ग्रुप या कंपनीला देण्यात आलंय. पण आम्ही संपर्क केला असता या कंपनीने प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. 14 राज्यांमध्ये या योजनेमुळे हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. वेळीच उपचार मिळाले तर अपघातात जीव गमावणार्‍यांपेकी अनेकांचे जीव वाचवता येतील पण राज्य सरकार ही योजना लागू करण्यासाठी उदासीन आहे.

close