महिलेवर बलात्कार करून जिवंत जाळलं

April 15, 2013 10:01 AM0 commentsViews: 8

15 एप्रिल

पुणे : इथं इंदापूर तालुक्यातल्या खोरोचीत विवाहीत महिलेवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी आरोपी धनंजय बोराडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे इंदापूरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काठेवाडी येथील ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती. गावातील एका जवळच्या नातेवाईकाच्या मयतीला घरातील माणसं गेली होती. त्यावेळी घरात कोणी नसताना जवळच्या डेअरीवर काम करणारा धनंजय बोराडे यानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिलं आणि घराला बाहेर कडी लावून पळून गेला. दरम्यान, या घटनेत इतर चारजणांचा समावेश असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

close