वाशिम जिल्ह्यातील गावकर्‍यांना पाण्यासाठी क्रेडिट कार्ड

December 28, 2008 8:22 AM0 commentsViews: 4

28 डिसेंबर, वाशिमगोविंद वाकडेखेड्यामध्ये पाणी पुरवठा योजना नेहमीच बंद पडते. यावर मात करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पिंपळखुटा इथल्या गावकर्‍यांना पाणीपट्टी भरण्यासाठी ' वॉटर क्रेडिट कार्ड ' देण्यात आले आहेत. या अभिनव योजनेचं गावकर्‍यांनी स्वागत केलं आहे.लोकसहभागाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवणे हे जलस्वराज्य योजनेचं उद्दिष्ट. पिंपळखुट्यात योजना तर पूर्ण झाली पण ती सुरळीत चालू रहावी यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने एक दुरुस्ती समिती निवडली. वॉल्व्हसाठी पाच अध्यक्षांसह 60 लोकांची या समितीत निवड केली . बिघाड झाल्यावर डागडुजी करण्यासाठी एक युवकाची निवड करुन त्याला प्रशिक्षण देण्यात आलं आहे . पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर म्हणुन निवड करण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय करण्यावर 20 रुपये दंड आकरण्यात येईल .पाणी पट्टी न भरणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येईल. "नागरिकांनी या योजनेचं जोरदार स्वागत केलं आहे. "क्रेडीट कार्ड मिळाल्यापासून पाण्याची काळजी नाही. आमच्याकडे भरपूर पाणी येतं" अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली.मल्टिनॅशनल कंपन्या आपल्या उत्पादनाच्या विक्रिसाठी ज्याप्रमाणे विविध सवलती व पॅकेज देतात त्याचप्रमाणे या गावातील समितीच्या पदाधिकार्‍यांनी लाभधारक कुंटुबाला क्रडिट कार्ड देण्याची योजनी जाहीर केली . एका वर्षाची पाणीपट्टी देऊन गावकर्‍यांना एक आकर्षक क्रेडीट कार्ड दिलं गेलं . या कार्डमुऴे ग्राहकाला हक्कायचं पाणी मिऴणार असा विश्वास मिळाला.आजपर्यंत या गावात 217 कुटुंबापैकी 130 कुटुंबानी एका वर्षाची आगाऊ पाणी पट्टी भरून क्रेडीट कार्ड मिळविले. सध्या या समितीकडे एक लाख 5 हजार रूपये एवढी पाणीपट्टी बॅंक खात्यात जमा झाली आहे. या पिंपळखुटा गावातील पाणी पुरवठा योजनेला असा ग्लोबल टच देणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असावी.

close