शरण येण्यासाठी संजय दत्तला हवा आणखी वेळ

April 15, 2013 11:18 AM0 commentsViews: 23

16 एप्रिल 13

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अभिनेता संजय दत्तनं आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. संजय दत्तनं आपल्याच वक्तव्यावरून घूमजाव करत शरण येण्यासाठीची मुदत 6 महिन्यांनी वाढवून मागितली. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी सुप्रीम कोर्टानं शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत संजय दत्तला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. संजयला शरण येण्यासाठी सुप्रीम कोर्टानs गुरुवारपर्यंतची म्हणजे 18 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. पण, आपल्याला आणखी वेळ द्यावा, अशी याचिका त्याने आज सुप्रीम कोर्टात केली. आपल्या माफीची याचिका राज्यपालांकडे दाखल आहे. त्यावर राज्यपाल निर्णय घेईपर्यंत शिक्षेला स्थगिती द्यावी, असं त्यानं या याचिकेत म्हटलंय. विशेष म्हणजे संजयला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यानं आपण माफीची याचिका करणार नाही असं म्हटलं होतं.

संजय दत्तसोबत मुंबई साखळी बॉम्बस्फोटातल्या इतर तीन दोषींनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. – झैबुन्निसा (70वर्षं) : 5वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झालीय. आपली दया याचिका राज्यपालांकडे असल्यानं त्यावर निर्णय होईपर्यंत शरण येण्यासाठी मुदत द्यावी, अशी याचिका झैबुन्निसा यांनी सुप्रीम कोर्टात केली – इशाक मोहम्मद आणि शरीफ अब्दुल गफ्फार – या दोघांनाही जन्मठेप सुनावण्यात आलीय. दोघंही वयोवृद्ध आहेत. राष्ट्रपतींकडे दयायाचिका केल्यानं आणि प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून कोर्टाला शरण यायला आपल्यालाही वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी या दोघांनीही केलीय.

close