अजित पवारांच्या उपोषणस्थळी गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न

April 15, 2013 11:37 AM0 commentsViews: 50

16 एप्रिल 13

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कराड इथल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या ठिकाणी प्रीतीसंगमावर आत्मक्लेशासाठी बसले होते. आज त्या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. अजित पवार या समाधीस्थळी बसल्याने हे स्थान अपवित्र झाल्याच्या घोषणा देत या कार्यकर्त्यांनी इथं गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. इंदापूर येथे झालेल्या सभेत अजित पवारांनी अर्वाच्य भाषेत आंदोलकांची खिल्ली उडवली होती. अजितदादांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी तीव्र निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. या प्रकरणी अजित पवारांनी विधासभेत आपल्या राजकीय कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चूक घडली मला माफ करा असा माफीनामा सादर केला होता. दादांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दादांना खडे बोल सुनावले. यानंतर रविवारी अजित पवार कराड इथं प्रीतिसंगमावर आले आणि दिवसभर एक ग्लास पाणीही न पिता आत्मक्लेश केला.जो काम करतो,तोच चुकतो,मी प्रायश्चित्त घेतोय, हा पब्लिसिटी स्टंट नाही, असं अजित पवार स्पष्ट केलं.

close