मुंबईसह महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता

April 15, 2013 1:21 PM0 commentsViews: 22

15 एप्रिल

मुंबई, पुणे शहरांसह राज्यातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याची शक्यता असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज विधानसभेत दिली. काही महिलांना पाकिस्तानात फिदायीन ट्रेनिंग म्हणजेच आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण देऊन तयार केलं जात असल्याची माहिती गुप्तहेरांकडून 12 फेब्रुवारी रोजी मिळाली. याला गृहमंत्र्यांनी दुजोरा दिलाय. आज प्रश्नोत्तराच्या तासाला याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला गृहमंत्र्यांनी हे लेखी उत्तर दिलंय. या संबंधी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे सर्व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक आणि सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना बिनतारी संदेशाद्वारे सतर्क करण्यात आल्याचंही गृहमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलंय. शिवाय पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना याबाबत सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आणि सतर्कतेचे आदेशही देण्यात आल्याचं उत्तरात म्हटलंय.

close