पेट्रोल 1 रुपयानं स्वस्त

April 15, 2013 1:35 PM0 commentsViews: 6

15 एप्रिल

महागाईने त्रस्त सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम मंत्रालयाने दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात एक रूपयाने कपात करण्यात आली आहेत. ही दर कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी दर कपात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आता पेट्रोलची किंमत प्रति बॅरल 119 डॉलर्स वरुन 116 डॉलर्स इतकी घसरली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या दरात झालेली कपात पेट्रोलियम कंपन्यांच्या फायदेशीर तर आहेच सोबत सरकारी सबसिडीही कमी होईल. मात्र क्रुड तेल जरी स्वस्त झाले असले तरी पेट्रोलच्या दरात कपात केली जाईल मात्र डिझेलचे दर जैसे थेच राहतील असं कंपन्यांनी स्पष्ट केलं.

close