येत्या शुक्रवारी मराठी सिनेमाचा ‘षटकार’

April 15, 2013 4:31 PM0 commentsViews: 17

15 एप्रिल

आयपीएलची धास्ती बॉलिवूडनं घेतली असली तरी मराठी चित्रपटसृष्टीवर आयपीएलचं दडपण नाही. उलट मराठी निर्मात्यांमध्ये सिनेमे रिलीज करायला चढाओढ सुरू आहे. येत्या शुक्रवारी सहा मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. मृणाल कुलकर्णीचा 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' हा नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमा.. मृणालचं पहिलं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सुनील बर्वे, पल्लवी जोशी, सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत. तर आशुतोष राणा पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. तो म्हणजे 'येडा'…येडा सिनेमात त्यानं आप्पा कुलकर्णीची भूमिका साकारलीय. चिंटू सिनेमाच्या यशानंतर श्रीरंग गोडबोले घेऊन येतायत 'चिंटू 2'.. या सिनेमात चिंटूची गँग खजिन्याच्या शोधात निघाली. गजेंद्र अहिरेचा 'टुरिंग टॉकीज'ही याच शुक्रवारी रिलीज होतोय. तंबूतल्या थिएटरची धमाल किशोर कदम, सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांनी उभी केली. याशिवाय टलेक लाडकीट आणि 'कुरूक्षेत्र' रिलीज होत आहे. कुरूक्षेत्रमध्ये प्रमुख भूमिका महेश मांजरेकर साकारत आहे. शुक्रवारी रामनवमी असल्यानं सुट्टीचा फायदा आपल्याला मिळेल असं प्रत्येक निर्मात्याला वाटतंय.

close