भाजप आणि जेडीयूमध्ये संघर्ष टोकाला !

April 15, 2013 5:22 PM0 commentsViews: 29

15 एप्रिल

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरून भाजप आणि नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड यांचे संबंध आता टोकाचे ताणले गेले आहेत. नितिशकुमार यांच्याकडून भाजपच्या एखाद्या नेत्याला सेक्युलर असण्याबद्दल सर्टिफीकेटची गरज नाही अशी तिखट प्रतिक्रिया भाजपनं दिलीय. नितीश कुमार यांनी रविवारी एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार सेक्युलर असला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. 2002 मध्ये म्हणजे गुजरातमध्ये दंगल सुरू असताना नितीशकुमार एनडीएच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. याची आठवण भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनी करून दिली. दुसरीकडे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आज बिहारमधल्या भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. नेत्यांनी डिसेंबरपर्यंत संयमाने वाट पहावी, असा सल्ला त्यांनी दिला.

close