शिवसेनेचे आ.ओमराजे निंबाळकर वर्षभरासाठी निलंबित

April 16, 2013 9:54 AM0 commentsViews: 43

16 एप्रिल

उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार ओमराजे निबांळकर यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय. त्यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी ही कारवाई केली. विधानसभेत उस्मानाबादमधल्या पाणी प्रश्नावर सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्यानं ओमराजे संतप्त झाले आणि त्यांनी राजदंड पळवला. राजदंड पळवणे ही गंभीर बाब मानली जाते. निंबाळकरांवरची कारवाई मागे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली. त्यासंबंधी सध्या गटनेत्यांची चर्चा सुरू आहे. या निलंबनाविरोधात विरोधकांनी काही काळ ठिय्या आंदोलनही केलं. त्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेतच ठिय्या आंदोलन करत निलंबन मागे घेण्याची मागणी केली.

close