1993 बॉम्बस्फोटातील 2 दोषीना मुदतवाढ नाहीच, शरण या !

April 16, 2013 10:12 AM0 commentsViews: 5

16 एप्रिल

1993 बॉम्बस्फोट प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलेल्या झैबुन्नीसा काझी हिची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. झैबुन्नीसाबरोबरच आणखी दोन दोषींची याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. झैबुन्नीसनं शरण येण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानं या तिघांनाही 18 तारखेला शरण जावं लागणार आहेत. झैबुन्नीसाच्या बाजूनं निकाल दिला तर राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जांचा पूर येईल असं मत सुप्रीम कोर्टाने मांडलंय. सुप्रीम कोर्टात आजच अभिनेता संजय दत्तच्या अर्जावरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता त्यावर कोर्ट काय निर्णय देतो याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करणार असल्याचं झैबुन्नीसाच्या वकिलांनी स्पष्ट केलंय.

close