छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत 10 माओवादी ठार

April 16, 2013 10:28 AM0 commentsViews: 7

16 एप्रिल

आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलीस आणि माओवादीत झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झाले असून या चकमकीत मल्ला राजे रेड्डी उर्फ सत्याण्णा हा माओवाद्यांचा बडा नेता चकमकीत मारला गेल्याचा अंदाज आहे. मल्ला राजे रेड्डी हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याचा 1980 च्या दशकात गडचिरोली मध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्यात सिंहाचा वाटा होता. त्याच्यावर आंध्रप्रदेश सरकारच 25 लाखाच बक्षीस आहे. ग्रेहाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी छत्तीसगड-आंध्र सीमेवर संयुक्त कारवाई केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झालेत. घटनास्थळांवरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.

close