वसतीगृह सोडत नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

April 16, 2013 1:24 PM0 commentsViews: 40

16 एप्रिल

पुणे : इथं समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहाच्या वॉर्डननं पोलिसांना बोलावून विद्यार्थांला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. वॉर्डन ए.शेख यांनी ही मारहाण घडवून आणली असा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे. हा विद्यार्थी गेली दोन वर्षं वसतीगृहात राहतोय. मुळचा गडचिरोलीचा असणार्‍या या विद्यार्थ्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.

परीक्षा संपल्यानंतर वसतीगृह सोडण्याचा नियम आहे. मात्र त्याची सीईटीची परीक्षा असल्यानं आपल्याला वसतीगृहामध्ये आणखी काही दिवस राहू द्यावं अशी विनंती विद्यार्थ्याने शेख यांच्याकडे केली होती. पण, शेख यांनी त्याला वसतीगृहातून निघून जायला सांगितलं. मात्र, हा विद्यार्थी वसतीगृह सोडून निघून गेला नाही. तेव्हा पोलिसांना बोलावून या विद्यार्थ्याला मारहाण करून रुम खाली करायला सांगितलं असा या विद्यार्थ्याचा आरोप आहे. त्याचबरोबर आपण नक्षलवादी असल्याची माहितीही शेख यांनी पोलिसांना दिल्याचं त्यानी सांगितलंय. शेख यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन समाजकल्याण विभागाचे अधिकारी रवींद्र कदम-पाटील यांनी दिली.

close