अनधिकृत इमारतीसाठी नेते एकवटले, ठाणे बंदची दिली हाक

April 16, 2013 1:31 PM0 commentsViews: 10

16 एप्रिल 13

ठाण्यात शिळफाट्याजवळ अनधिकृत इमारत दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई मोहीम सुरु केली आहे. मात्र या मोहिमेला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. येत्या गुरुवारी त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. प्रशासनाकडून ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींना नोटिसा लावण्यात आल्या आहेत. तर चोवीस तासात ही इमारत खाली करण्याचे तिथं राहणार्‍या रहिवाशांना देण्यात आले आहेत.

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहाणार्‍या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तृळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणानी अनधिकृत इमारतींमध्ये राहाणार्‍या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरु केलीय. सुमारे 1049 धोकादायक आणि 67 अति धोकादायक बेकायदा इमारतींसह सुमारे 5000 बांधकामांना नोटिसा बजावण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहे. त्यामुळं अनधिकृत बांधकामांवरुन सुरु असलेल्या कारवाईमुळं इथला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

close