बंगलोरचा दिल्लीवर ‘रॉयल’ विजय

April 16, 2013 6:26 PM0 commentsViews: 10

16 एप्रिल

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं आपली पराभवाची मालिका कायम राखलीय. दिल्लीला स्पर्धेत सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या लढतीत बंगलोर रॉयलनं दिल्लीवर 3 रन्सनं मात केली.. सुपर ओव्हरमध्ये बंगलोरनं 16 रन्स केले. एबी डिव्हिलिअर्सनं दोन खणखणती सिक्स मारले. तर दिल्लीला 2 विकेट गमावत 12 रन्स करता आले. बंगलोरच्या रवि रामपॉलनं 2 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्लीनं 5 विकेट गमावत 152 रन्स केले होते. याला उत्तर देताना बंगलोरची सुरुवात खराब झाली. ओपनर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल झटपट आऊट झाले. पण यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्सनं फटकेबाजी करत इनिंग सावरली. बंगलोर ही मॅच सहज जिंकणार असं वाटत असतानाच झटपट तीन विकेट गेल्या आणि बंगलोरनं 7 विकेट गमावत 152 रन्स केले. अखेर सुपरओव्हरमध्ये बंगलोरनं विजय मिळवला.

close