‘ठाणे बंद’वरून महायुतीत तणाव, भाजपचा विरोध

April 17, 2013 9:53 AM0 commentsViews: 6

17 एप्रिल

ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामाविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारल्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीत तेढ निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय बंदला भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. मताच्या राजकारणासाठी हा बंद करून सर्वसमान्यांना वेठीस धरू नये असं आवाहन भाजपनं केलंय. यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय. सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंदला सहभागी होण्याची शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या बंदमुळे सामान्य माणूस भरडला जाणार असल्यामुळे याबंदला आपला विरोध असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

close