आ.क्षितिज ठाकूर- राम कदम यांच्यासह PSI सुर्यवंशीही दोषी

April 17, 2013 2:07 PM0 commentsViews: 20

17 एप्रिल

पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी गणपतराव देशमुख समितीचा अहवाल तयार झाला आहे. यामध्ये मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर दोषी असल्याचं चौकशीत सिद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर पीएसाय सचिन सुर्यवंशीही यामध्ये दोषी असल्याचं सिद्ध झालंय. तर इतर तीन निलंबित आमदारांना मात्र क्लिन चीट देण्यात आली आहे. या अहवालात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवरदेखील ताशेरे ओढण्यात आले आहे. देशमुख समितीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांना सादर करण्यात आला आहे. विधानभवनाच्या परिसरात आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांनी पीएसआय सचिन सुर्यवंशींना मारहाण केली होती. या प्रकरणी कदम-ठाकूर यांच्यासह इतर तीन आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तर कदम आणि ठाकूर यांनी तीन दिवसांच्या तरूंगाची हवा खावी लागली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गणपतराव देशमुख समिती स्थापन करण्यात आली होती. आता या समितीचा अहवाल तयार झाला असून लवकरच तो जाहीर करण्यात येणार आहे.

close