यवतमाळजवळ सुमो-ट्रेलरची टक्कर, 9 ठार

April 17, 2013 1:44 PM0 commentsViews: 17

17 एप्रिल

नागपूर – औरंगाबाद हायवेवर यवतमाळजवळ टाटा सुमो आणि ट्रेलरची समोरासमोर भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहेत तर 20 जण गंभीर झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या खरड गावाजवळ हा अपघात झालाय. अपघातातील मृत व्यक्ती सोनेगावला दर्शनासाठी जात होते, त्यावेळी हा दुर्घटना घडली. जखमींवर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर आणि वाशिममधल्या कारंजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

close