नाशिकमध्ये भरलंय पक्षी मित्र संमेलन

December 28, 2008 12:19 PM0 commentsViews: 14

28 डिसेंबर नाशिकनाशिकजवळच्या नांदूर माधमेश्वरमध्ये पक्षी मित्र संमेलन भरलंय. नांदूर माधमेश्वरमध्ये भरलेल्या या 22 व्या पक्षी मित्र संमेलनात राज्यातले 150 पक्षीप्रेमी आणि अभ्यासक सहभागी झाले आहेत. पक्षी अभ्यासक भाऊ काटदरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झालं.गोदावरी आणि कादवा या नद्यांच्या संगमावर नांदूर माधमेश्वर बंधारा आहे. पाणीपुरवठा करण्याचा त्याचा मुख्य उद्देश होता. पण इथल्या नैर्सगिक वातावरणामुळे इथं दुसरं एक बायप्रोडक्ट तयार झालं ते म्हणजे पक्षांच्या वास्तव्याच ठिकाण. देशी-विदेशी पक्षांच्या वास्तव्यामुळे इथल्या परिसराचं रुपांतर झालं ते पक्षी अभयारण्यात. नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्यात नॉर्दन शॉवलर, कॉमन कूट, पर्पल मूरहेन, कोम्ब डक असे अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. कुणी थेट सैबेरियातून आलेलं, तर कुणी ऑस्ट्रियातून. काहींचा मुक्काम थंडीपर्यंत, तर काही इथलेच निवासी. एक ना दोन हजारो पक्ष्यांसाठीचा हा हक्काचा मुक्काम आहे. अशा या दूरवरच्या पाहुण्यांना बघायला या पक्षी मित्र संमेलनात लोकही तितक्याच लांबून आले होते.

close