‘युवराजमध्ये कॅप्टनपदाचे गुण नव्हते म्हणून उचलबांगडी केली’

April 17, 2013 4:25 PM0 commentsViews: 4

17 एप्रिल

आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर पुणे वॉरियर्सची गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर परतलीय. मैदानावर टीमची कामगिरी दमदार होतेय, पण सध्या मैदानाबाहेर एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे वॉरियर्सचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं एका बेधडक वक्तव्यानं खळबळ उडवून दिलीय. 2011 च्या आयपीएल मोसमात पुण्याच्या अपयशी कामगिरीनंतर युवराज सिंगमध्ये कॅप्टनपदाला आवश्यक गुण नाहीत याचा अंदाज टीम व्यवस्थापनाला आला, त्यामुळेच त्याची कॅप्टनपदावरुन उचलबांगडी केली असं खळबळजनक वक्तव्य गांगुलीनं केलंय. यंदाच्या हंगामातही अँजेलो मॅथ्यूज, रॉस टेलर या परदेशी खेळाडूंवरच टीमनं विश्वास टाकत युवराजला दूर ठेवल्याचं गांगुलीनं म्हटलं आहे. कॅप्टनपदासाठी युवराज तयार नसल्यानं मॅथ्यूजवर जबाबदारी सोपवल्याचं टीम व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पण आता गांगुलीच्या या वक्तव्यानंतर पुणे टीमनं सारवासारव करण्यासाठी हे म्हटल्याचं स्पष्ट होतंय.

close