IBN लोकमत इम्पॅक्ट : गुंडगिरीला चपराक, ‘तो’ गोठा हलवणार !

April 17, 2013 12:15 PM0 commentsViews: 72

17 एप्रिल

पुण्याच्या शिवाजी रोडवर श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व तंत्र माध्यमिक शाळेच्या पार्किंग परिसरात एका तडिपार गुंडानं चक्क गाई- बकरीचा गोठा बांधल्याची बातमी आयबीएन लोकमतनं उघडकीस आणली होती. याची दखल घेत मनपा प्रशासनानं आज या जागेची पहाणी केली. येत्या दोन-तीन दिवसात या जागेवरचा गाई -बकरीचा गोठा हलविण्याचे आदेश महापालिका प्रशासना कडून देण्यात आले आहेत. याची माहिती आज विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अरूण खिलारी यांनी दिली. या शाळेच्या पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून गाई – बकरीचा गोठा बाधणारा गुंड नदकूमार नाईक याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टान नदकूमार नाईकला दोन हजार रूपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मजूर केला आहे.

close